कोल्हापूर, दि. ३० डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे
प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या ४१व्या स्मृतीदिनानिमित्त आज
विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
शिवाजी
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ. पवार यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी’च्या वतीने डॉ. जी.पी.
माळी यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी
प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.
अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी
विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. नीलांबरी जगताप, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. जे.जी. जाधव,
हसन देसाई, प्रा. एस. बी. कणसे, डॉ. मानसिंगराव जगताप, विद्यार्थी भवन
अधीक्षक डी.एच. भादले, प्रा. संतोष गोजारे, प्रा. आर. एस. गाडे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. कुलगुरू
यांच्या हस्ते विद्यापीठ अतिथीगृहासमोरील डॉ. पवार यांच्या पुतळ्यासह विद्यार्थी
भवनमधील पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. जे.जी. जाधव
यांचे ‘डॉ. आप्पासाहेब पवार यांचे काळ आणि कर्तृत्व’ या विषयावर व्याख्यान झाले. पौर्णिमा पवार यांनी प्रास्ताविक केले. अक्षता बिराजदार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. पवन कांबळे, अजय सकटे यांनी सूत्रसंचालन केले. स्वराज पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थी भवनचे अधीक्षक डी. एच. भादले, जी. आय. नाईक, जे. एस. गुरव, बी. ए. पाटील, ए. एस. चरापले, एस. बी. तुराई यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न
केले.
No comments:
Post a Comment