कोल्हापूर, दि. ८ डिसेंबर:
संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांना अभिवादन
करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज सकाळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास
शिंदे आणि मराठी अधिविभाग प्रमुख तथा संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार
मोरे यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात
आला. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, आजीवन अध्ययन
केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि
विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment