Sunday, 17 December 2023

बहारदार 'स्वररंगां'त रंगले विद्यापीठ

 ग्रंथमहोत्सवात संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रम

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभातील ग्रंथमहोत्सवानिमित्ताने आयोजित 'स्वररंग' कार्यक्रमात सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी. 

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभातील ग्रंथमहोत्सवानिमित्ताने आयोजित 'स्वररंग' कार्यक्रमात सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनी.

शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षान्त समारंभातील ग्रंथमहोत्सवानिमित्ताने आयोजित 'स्वररंग' कार्यक्रमास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.


कोल्हापूर, दि. १७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६० व्या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित ग्रंथमहोत्सवामध्ये संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वररंग या सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अवघे विद्यापीठ रंगले. संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदी-मराठी चित्रपट गीतांसह सुफी, लोकधारा, लावणी आणि कव्वालीचे अत्यंत बहारदार सादरीकरण केले. दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात पंधराहून अधिक गाणी विद्यार्थ्यांनी सादर करून सारे सभागृह मंत्रमुग्ध करून सोडले.

गायक सौरभ बुवा, ऋचा गावंदे, अनिकेत निर्मळे, प्रियांका मिरजकर, मयुरी जाधव आणि अन्य विद्यार्थ्यांसह प्रशांत देसाई (तबला), विक्रम परीट (ढोलकी), आकाश साळोखे (पियानो), मनोज जोशी (ऑक्टोपॅड) यांनी संगीतसाथ केली, तर श्रीधर जाधव यांनी साऊंड सिस्टीमची जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमास कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, बॅ. बाळासाहेब ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, अंतर्गत लेखापरीक्षक अजित चौगुले, उपकुलसचिव प्रिया देशमुख, लेखापाल वैशाली थोरात, संगीत व नाटयशास्त्र अधिविभागाचे डॉ. विनोद ठाकूर-देसाई, डॉ. निखिल भगत, डॉ. प्रकाश बिलावर यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment