कोल्हापूर, दि.30 डिसेंबर - शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या 42 व्या स्मृतीदिनानिमित्त आज विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारामध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ.पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 'डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी'च्या वतीने डॉ.सी.टी.पवार यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, प्रा.किसनराव कुराडे, डॉ.जे.जी.जाधव, डॉ.मानसिंगराव जगताप, डॉ.जे.पी.माळी, डॉ.प्रकाश बिलावर, डॉ.डी.के.गायकवाड, डॉ.के.एम.गरडकर, डॉ.एन.एल.तलवार, डॉ. जे जे जाधव, प्रा.टी.के.सरगर, प्रा.सी.एच.भोसले, डॉ.अशोक जगताप, विद्यार्थी भवन अधीक्षक डी.एच.भादले, अशोक साबळे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
मा.कुलगुरू यांच्या हस्ते विद्यापीठ अतिथीगृहासमोरील डॉ.पवार यांच्या पुतळयासह विद्यार्थी भवनमधील पुतळयास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाचे माजी विभागप्रमुख प्रा.चंद्रकांत भोसले यांचे 'विद्यार्थी भवनचे संस्कार आणि करिअरची जडणघडण' या विषयावर व्याख्यान झाले. डॉ.डी.एच.भादले यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती करूणा गायकवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.सी.टी.पवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. योगेश करचे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण कारंडे यांनी आभार मानले. विद्यार्थी भवनचे अधीक्षक डी.एच.भादले, सचिन बनसोडे, कागल बागल, जयदिप गुरव, गजानन नाईक, बाहुबली पाटीलयांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
-----
No comments:
Post a Comment