Thursday 14 March 2024

कीटकविश्वाची विद्यार्थ्यांना भुरळ; प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यापीठात मोठी गर्दी

 






शिवाजी विद्यापीठात आयोजित कीटक प्रदर्शन पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची मोठी झुंबड उडाली.

कोल्हापूर, दि.१४: शिवाजी विद्यापीठात भरवण्यात आलेल्या भव्य कीटक प्रदर्शनाच्या माध्यमातून किटकांचे विश्व जाणून घेण्यासाठी परिसरातील विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. 

आपल्या पर्यावरणात सभोवताली असणाऱ्या सर्व प्रकारच्या कीटकांचे अनोखे विश्व समजून घेण्यासाठी विविध शाळांच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह उपस्थिती दर्शविली.

काल दिवसभरात विद्यापीठातील विविध अधिविभागांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिले. आज सकाळपासूनच विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.  येथील शिक्षक, संशोधक विद्यार्थ्यांकडून या कीटकांच्या अद्भुत विश्वाची माहिती जाणून घेतली. आपल्या अस्तित्वासाठी कीटकांचे अस्तित्व महत्त्वाचे असल्याचे या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.  येथून पुढील काळात आपण किटकांना समजून घेऊन 'जगा आणि जगू द्या' या न्यायाने त्यांची काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने कीटकविश्वाविषयी फार मोठे जागृतीचे काम केले आहे, अशी भावना शालेय शिक्षकांनी व्यक्त केल्या. उद्याही हे प्रदर्शन चालू राहणार असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आवर्जून या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन समन्वयक डॉ. सुनील गायकवाड यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment