पर्यावरणपूरक प्लास्टीक निर्मितीचे संशोधन
![]() |
आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेतील द्वितिय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना सुरजित अडगळे. सोबत डॉ. सिद्धेश्वर जाधव व राहुल जाधव |
कोल्हापूर, दि. १९ मार्च: आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन
स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा संशोधक सुरजित अडगळे याच्या ‘सिंथेसाइझिंग बायोप्लास्टीक अँड वेगन
लेदर’ या संशोधनास मूलभूत
विज्ञान प्रकारामध्ये द्वितिय क्रमांक प्राप्त झाला. मुंबई विद्यापीठात नुकत्याच राष्ट्रीय
व आंतरराष्ट्रीय अन्वेषण स्पर्धा पार पडल्या.
सुरजित अडगळे याने
निवडुंगाच्या गरापासून जैविक प्लास्टीक आणि चामडे यशस्वीपणे बनवून या प्रकल्पाचे
स्पर्धेत सादरीकरण केले. त्याच्या या प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले.
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील पश्चिम विभागीय
अन्वेषण संशोधन स्पर्धेचे यजमानपद शिवाजी विद्यापीठाने भूषविले. दि. २८ व २९
डिसेंबर, २०२३ या कालावधीत सदर स्पर्धा विद्यापीठात झाली. यात महाराष्ट्र व गुजरात
राज्यांतील ११ विद्यापीठांचे १०६ संशोधक विद्यार्थी एकूण ६४ प्रकल्पांसह सहभी
झाले. शिवाजी विद्यापीठाचा सहा जणाचा संघ होता. या स्पर्धेत सांगलीच्या विलिंग्डन
महाविद्यालयाच्या सुरजित घनश्याम अडगळे याला तृतीय क्रमांक मिळाला आणि त्याची पुढील
स्पर्धांसाठी निवड झाली. यंदा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धा
एकत्रितपणे ११ व १२ मार्च २०२४ रोजी मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय
अन्वेषन संशोधन स्पर्धेमध्ये विविध विषयातील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. संशोधक अशा
त्रिस्तरीय स्पर्धेत देशातील २८ विद्यापीठांतील एकूण १५७ विद्यार्थी सहभागी झाले. सुरजित
अडगळे याच्या प्रकल्पाला मूलभूत विज्ञान गटात द्वितिय क्रमांक मिळाला. त्याला बक्षिसापोटी
रु. ५०,०००/- रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संघ व्यवस्थापक म्हणून राहुल जाधव आणि अन्वेषण
समन्वयक म्हणून डॉ. सिध्देश्वर जाधव (दोघेही विलिंग्डन कॉलेज, सांगली) उपस्थित
होते.
अडगळे यांच्या यशाबद्दल कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, आणि विद्यार्थी
विकास संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment