Wednesday, 6 March 2024

कबड्डी पुरुष प्रकारात तंत्रज्ञान, क्रीडा, वाय.सी.आर.डी.सी., एमबीए अधिविभाग उपांत्य फेरीसाठी पात्र

शिवसस्पंदन क्रीडा महोत्सव (दिवस दुसरा):



शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन क्रीडा महोत्सवांतर्गत दुसऱ्या दिवशी अॅथलेटिक्सच्या विविध क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा झाल्या. यातील धावणे, लांब उडी स्पर्धांतील  काही चुरशीचे क्षण.


कोल्हापूर, दि. मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्यावतीने शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी क्रिकेट (महिला) या प्रकारात तृतीय क्रमाक नॅनो सायन्स या विभागाने मिळवला. अंतिम फेरीसाठी गणित अधिविभाग विरुध्द इतिहास अधिविभाग यांचा सामना मार्च रोजी होईल. 

ॲथलेटिक्स मधील 100 मी, 200मी, 400मी, गोळा फेक, 4 x 100 रिले, लांब उंडी या खेळप्रकारातील प्रथम फेरीच्या स्पर्धा पार पडल्या.

क्रिकेट मुले या प्रकारात उपात्य पुर्व फेरीसाठी ए.जी.पी.एम. अधिविभाग, गणित अधिविभाग, त़ंत्रज्ञान अधिविभाग, इतिहास अधिविभाग, रसायनशास्त्र अधिविभाग, क्रीडा अधिविभाग, संगणकश़ास्त्र अधिविभाग, जैवतंत्रज्ञान अधिविभाग हे संघ पात्र ठरले आहेत.

कबड्डी महिला या प्रकारात तृतीय क्रमांक हा पर्यावरण अधिविभागने मिळावला.  तरी अतिम फेरीसाठी तंत्रज्ञान अधिविभाग विरुध्द गणित अधिविभाग यांच्या 7 मार्च रोजी सामना होणार आहे.  कबड्डी पुरुष प्रकारात तंत्रज्ञान अधिविभाग, क्रीडा अधिविभाग, वाय.सी.आर.डी.सी. अधिविभाग, एम बी अधिविभाग हे संघ उपात्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

No comments:

Post a Comment