कोल्हापूर, दि. ८ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन
वार्षिक क्रीडा महोत्सवात अखेरच्या दिवशी तंत्रज्ञान अधिविभागाने विविध क्रीडा
प्रकारांतील आपले वर्चस्व सिद्ध केले. कबड्डीसह क्रिकेट आणि रस्सीखेच या
स्पर्धांमध्ये तंत्रज्ञान अधिविभागाच्या संघांनी विजेतेपद मिळविले.
कबड्डी स्पर्धेत तंत्रज्ञान अधिविभागाच्या पुरूष व महिला संघांनी
विजेतेपद मिळविले. पुरूष गटात क्रीडा आणि एमबीए अधिविभागांनी अनुक्रमे द्वितिय व
तृतीय क्रमांक मिळविले. महिला गटात गणित आणि पर्यावरणशास्त्र अधिविभागांनी
अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांक मिळविले.
क्रिकेटमध्ये पुरूष गटात तंत्रज्ञान, क्रीडा आणि गणित अधिविभागांनी
अनुक्रमे तीन क्रमांक पटकावले. महिला गटात गणित, इतिहास आणि नॅनोसायन्स व
तंत्रज्ञान या अधिविभागांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. रस्सीखेच स्पर्धेत
पुरूष गटात तंत्रज्ञान, एमबीए आणि रसायनशास्त्र यांनी तर महिला गटात नॅनोसायन्स व
तंत्रज्ञान, गणित आणि इलेक्ट्रॉनिक्स या अधिविभागांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक
पटकावले.
विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या वतीने ४ ते ७ मार्च या कालावधीत
पार पडलेल्या या स्पर्धेच्या अंतिम दिवसाचा पारितोषिक वितरण समारंभ वित्त व
लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ दत्तात्रय गायकवाड, डॉ. शिवलिंगप्पा सपली आणि क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे प्रमुख उपस्थित
होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी डॉ. एन.डी. पाटील, डॉ. प्रशांत पाटील, एन.आर. कांबळे, डॉ आय.एच. मुल्ला, सुभाष पोवार, डॉ. सचिन पाटील, सुचय खोपडे, डॉ. नवनाथ वळेकर, डॉ. आण्णा गोफणे, डॉ. क्रांतीकुमार मोरे, धीरज पाटील यांच्यासह आनंदा तळेकर, सुनील देसाई व क्रीडा अधिविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. पंच
म्हणून विशांत भोसले, विक्रम कोंढावळे, राजेश कोळी, संतोष खाडे, विशाल हिलगे,
योगेश दळवी, युवराज साबळे, अमर पाटणकर, प्रमोद सामुद्रे, उदय करवडे यांच्यासह
विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment