'द अनबिटेबल' पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ज्योती क्षीरसागर, विजयसिंह माने, मनिषा माने, डॉ. अजय मस्के, अश्विनी कांबळे, मनिष आपटे आदी. |
कोल्हापूर, दि. १
जानेवारी: अधिकाधिक उत्तम काम करण्यासाठी ‘द अनबिटेबल’ हे पुस्तक प्रवृत्त करते.
विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी ते आवर्जून वाचायला हवे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
प्रेरक वक्ते म्हणून लोकप्रिय असणारे वाठार येथील डॉ. अजय मस्के आणि अश्विनी
कांबळे यांनी लिहीलेल्या ‘द
अनबिटेबल: एन एनलाइटन्ड पिक
परफॉर्मर’ या पुस्तकाचे प्रकाशन
आज सकाळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तुरची-तासगाव
येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख पोलीस अधीक्षक ज्योती
क्षीरसागर, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने आणि
जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘द
अनबिटेबल’ पुस्तकाची अनेक
वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. मस्के यांच्या
स्वतःच्या अनुभवांतून ते आले आहे. अनुभवांतून आल्यामुळे त्याची विश्वासार्हता
वाढली आहे आणि त्यांची प्रचिती घेता येऊ शकते. अंगिकृत कोणतेही काम एखादा उत्तम
करीतच असतो, पण ते त्याहूनही अधिक चांगले करता येऊ शकते, हे सांगून त्या दिशेने
जाण्यास हे पुस्तक वाचकाला प्रवृत्त करते. डॉ. मस्के यांनी विद्यार्थ्यांमधील
रोजगाराभिमुखता वाढविण्यासाठी आणि त्यांना रोजगार प्रदान करण्यासाठी ते करीत
असलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर म्हणाल्या, डॉ. मस्के यांनी आयुष्यात
खूप सुरवातीपासून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम अंगिकारले, त्याची मी
साक्षीदार आहे. त्या कार्याचे फलित म्हणजे हे पुस्तक आहे. ते विद्यार्थ्यांसाठी
अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजयसिंह माने यांनीही यावेळी पुस्तकाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात सुरवातीला कौस्तुभ बारवडे यांनी स्वागत केले. अश्विनी कांबळे यांनी
पुस्तक परिचय करून दिला, तर डॉ. अजय मस्के यांनी आभार मानले. यावेळी डॉ. श्रीकांत
पाटील, वारणा कालवे विभाग इस्लामपूरचे कार्यकारी अभियंता डी.डी. शिंदे, रेडिओ
मिर्चीचे आरजे मनिष आपटे, स्टेशन हेड विक्रांत हलगली, अकाऊंट व्यवस्थापक नितीन
माणगावे, श्री अत्री प्रिंटींग प्रेसचे साई प्रसाद, उमेश सुतार, सूरज चौगुले, अजित
शिंदे, सूरज चव्हाण, ओंकार मगदूम आदी उपस्थित होते.
Thanks Sir
ReplyDeleteCongratulations Dr. A. J. Mhaske sir
ReplyDeleteCongratulations
ReplyDeleteCongrats Sir 👍
ReplyDeleteCongratulations Sir.
ReplyDelete