शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, भारत (SUK)
विदेशी भाषा विभाग
आणि मराठी विभाग
आणि
रशियन स्टेट
युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज,
मॉस्को, रशिया (RSUH)
द
इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज
आंतरराष्ट्रीय
बहुविद्याशाखीय परिसंवाद
“Open Pages in
South Asian Studies - IV”, Kolhapur, India
“ओपन पेजेस इन
साउथ एशियन स्टडीज - IV”,
कोल्हापूर, भारत
‘दक्षिण आशिया: ‘अज्ञात’
अवकाशांचा शोध
विषय
The Contemporary
Dynamics of South Asia - 2022
दक्षिण आशिया: समकालीन
गतिमान वास्तव - 2022
२९
- ३१, जानेवारी,
२०२२
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत.
"ओपन पेजेस
इन द साउथ एशियन स्टडीज" ही एक आंतरराष्ट्रीय परिसंवादाची मालिका आहे. रशियन
स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज (RSUH), मॉस्को, रशिया ही संस्था दक्षिण आशियातील इतर
विद्यापीठांच्या सहकार्याने हे परिसंवाद आयोजित करते. "ओपन पेजेस इन साउथ
एशियन स्टडीज” या मालिकेतील यापूर्वीचे परिसंवाद २०११ व २०१३ साली रशियातील मॉस्कोमध्ये
आणि २०१९ मध्ये भारतातील गुवाहाटी,
आसाम येथे पार पडले. दक्षिण आशियाच्या 'अज्ञात'
अवकाशांचा ‘शोध’ घेत त्याची एक नवी प्रतिमा सादर
करण्यात हे परिसंवाद अत्यंत यशस्वी ठरले. ही शोध शृंखला पुढे चालू ठेवण्याच्या
उद्देशाने या मालिकेतील चौथ्या परिसंवादाचे आयोजन करत आहोत.
भाषा, साहित्य, कला, इतिहास, सामाजिक विज्ञान
आणि मानव्यशास्त्र या विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या
अनुभवी संशोधक आणि तरुण तज्ज्ञांना या परिसंवादात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत
आहोत.
दक्षिण आशिया
समकालीन दक्षिण
आशियामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश,
भूतान,
भारत,
मालदीव,
नेपाळ,
पाकिस्तान
आणि श्रीलंका या आठ देशांचा समावेश होतो. सिंधू संस्कृतीचा एक भाग असलेल्या या
देशांना सामाईक उगम आणि इतिहास आहे. सामाईक भूप्रादेशिक स्थान या देशांना आशियाचा
उप-प्रदेश म्हणून सांस्कृतिक, सामाजिक
आणि राजकीयदृष्ट्या एकत्र आणते.
हिंदू
आणि बौद्ध धर्म या जगातील दोन महान धर्मांचा उगम दक्षिण आशियात झाला आहे. परंतु तिथे
मोठ्या प्रमाणात मुस्लिम, ख्रिश्चन
आणि शीख धर्मीय लोकसंख्या आहे,
तसेच इतरही विविध धर्मांच्या अनुयायांचे मोठे गट देखील आहेत.
वांशिक-भाषिक
बहुलवाद हे दक्षिण आशियाई देशांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. परंतु त्याचवेळी
सदस्य देशांमधील विवादित संबंध आणि
उप-राष्ट्रवादी आणि फुटीरतावादी चळवळींच्या रूपात देशांतर्गत संघर्ष याचे देखील तो
एक प्रमुख कारण आहे. हा प्रदेश दहशतवादाच्या समस्येचे माहेरघर आहे. या समस्येने केवळ
मानवी आणि राष्ट्रीय विकासच खुंटला आहे असे नव्हे,
तर
त्याच्या परिणामी या प्रदेशातील देशांमधील परस्पर आकलन आणि सौहार्दपूर्ण संबंधांचा
मार्ग देखील धूसर झाला आहे. शिवाय
समकालीन जागतिक व्यवस्थेत दक्षिण आशियाई देशांमधील सीमासंघर्षातून हा प्रदेश अधिक
अस्थिर आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बनतो. ‘दक्षिण आशियाई प्रादेशिक
सहकार्य संघटने’स (SAARC) दक्षिण आशियातील देशांमध्ये राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या एकात्मता
निर्माण करणे अनिवार्य आहे. परंतु या देशांतील वादग्रस्त संबंधांमुळे एकात्मता आणि
सहकार्याचे अपेक्षित परिणाम घडवून आणण्यात ती अपयशी ठरली आहे.
दक्षिण आशियाई देशांमधील राजकीय व्यवस्थांच्या स्वरूपामुळे
हा प्रदेश राजकीय आणि भू-रणनीतिकदृष्ट्या आणखीनच वेगळा ठरतो. बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांसारख्या देशांमधील अधूनमधून येणारी
हुकूमशाही आणि लष्करी शासन यासह लोकशाही संक्रमण आणि एकत्रीकरणाचा दक्षिण आशियास मोठा
इतिहास आहे. प्रादेशिक आकाराच्या दृष्टीने भूतान हा
एक छोटासा देश असला तरी, ‘सकल
राष्ट्रीय आनंदा’च्या (Gross National Happiness)
या
नवकल्पनेमुळे शाश्वत विकास आणि शांती संस्कृतीची हमी, त्यास प्रोत्साहन यामध्ये या
प्रदेशाकडे जागतिक स्तरावर मोठे लक्ष वेधले गेले आहे.
देशाच्या
सीमांपलीकडे स्थलांतर हा या प्रदेशात एक वादाचा मुद्दा आहे. दक्षिण आशियातील सर्व
देशांमध्ये नव-उदारवादी आर्थिक धोरणांच्या एकत्रीकरणाने अनेक संधी आणि आव्हाने आणली
आहेत. सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) बाबतीत पाहिले तर या प्रदेशातील अनेक
देशांनी लक्षणीय प्रगती पाहिली. परंतु त्याचबरोबर उत्पन्न
आणि इतर सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्ये विषमता आहे. विषमतेसह वाढ यामुळे या प्रदेशातील लोकांच्यात आक्रोश आहे.
कामगारांचे अनौपचारिकीकरण आणि अत्यावश्यक सेवांच्या वाढत्या खाजगीकरणामुळे
पर्यावरण आणि सामान्य संसाधनांबद्दल चिंता तर वाढते आहेच,
पण त्याचबरोबर विषमता आणि असुरक्षिततेच्या नवीन प्रकारांची भर पडली आहे.
हा
प्रस्तावित परिसंवाद आंतरविद्याशाखीय स्वरूपाचा असेल. या परिसंवादात संबंधित
देशांच्या परिप्रेक्ष्यातून, तसेच एक आंतरराष्ट्रीय प्रादेशिक घटक म्हणून दक्षिण
आशियाच्या परिप्रेक्ष्यातून या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न
होईल.
परिसंवादात विचारमंथनासाठी मुद्दे:
१. दक्षिण
आशियाई देश: सामाईक ऐतिहासिक बंध
§ नवीन सैद्धांतिक संशोधनाच्या दृष्टीकोनातून दक्षिण आशियाई प्रदेशातील प्राचीन, वसाहतिक आणि उत्तर-वसाहतिक बंध
§ वसाहतीकरणाचा प्रभाव आणि निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रिया
§ दक्षिण आशियाई प्रादेशिकतावाद आणि एकात्मता:
प्रवाह, समस्या आणि संभावना
२. भाषा,
कला,
साहित्य आणि अनुवाद: प्रगती आणि
शांततेच्या दिशेने
§ २१ वे शतक: नवीन प्रवाह. नवी दिशा. नवे प्रयोग
§ रूढीबद्ध धारणा खंडन. नवीन कल्पनांची निर्मिती आणि प्रवास
§ जागतिक परिप्रेक्ष्यात दक्षिण आशियातील भाषा
§ भाषा आणि शिक्षण
§ पुरोगामी बदल आणि शांती यासाठी उत्प्रेरक म्हणून कलाकार/ लेखक/ कवी/ अनुवादक
३. दक्षिण आशिया: समाज आणि संस्कृती
§ जागतिक संदर्भात दक्षिण आशियाचा सांस्कृतिक
वारसा
§ वांशिक बहुलवाद,
सांस्कृतिक बहुविधता आणि बहुसांस्कृतिकता यांसमोरील आव्हाने
§ जागतिकीकरण आणि संक्रमणावस्थेतील संस्कृती.
§ स्थलांतर आणि संघर्ष. अल्पसंख्याक आणि परिघावरील घटक
§ धर्म आणि जात. अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक मनोवृत्ती
§ विज्ञान आणि तंत्रज्ञान: युवक. समाजावरील प्रभाव.
§ राष्ट्रवाद आणि पार-राष्ट्रवाद
४. मानवी
हक्क
§ मानवी हक्कांसाठी लोकांचा संघर्ष
§ भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने
५. लिंगभाव आणि सत्ता
§ दक्षिण आशियातील पितृसत्ताकता
§ लिंग आणि वर्ग / जात / धर्म.
§ रूढीवादी विचार खंडन आणि मानवी हक्कांसाठी महिलांचा /
तृतीय पंथीयांचा संघर्ष
§ लिंग ओळख. लिंगभाव समानतेच्या दिशेने.
६. पर्यावरण आणि शाश्वत विकास
§ २१ व्या शतकातील आव्हाने आणि प्रतिसाद
७. अर्थशास्त्र
§ २१व्या शतकातील दक्षिण आशिया आणि अर्थव्यवस्था
§ नव-उदारमतवादी आर्थिक धोरणे आणि दक्षिण आशियाई देश
८. रशिया आणि दक्षिण आशिया:
§ संबंध आणि आंतर-संबंध
९. मध्य
आणि पूर्व आशियामधील दक्षिण आशिया
§ भूतकाळ आणि वर्तमान
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परिसंवाद ऑनलाइन आयोजित होत आहे.
आयोजक:
• RSUH / RGGU/ : फॅकल्टी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड
फॉरेन एरिया स्टडीज
ऑफ द इन्स्टीटयूट ऑफ हिस्टरी अँड अर्काइव्ह्ज्
द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज,
रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज,
मॉस्को,
रशिया
(RSUH)
• SUK
:
विदेशी
भाषा विभाग व मराठी विभाग,
शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर.
महाराष्ट्र, भारत.
निमंत्रक:
प्रा. अलेक्सांद्र स्तल्यारव
संचालक,
द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज,
रशियन
स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को,
रशिया
(RSUH)
डॉ. मेघा पानसरे
सहायक प्राध्यापक (रशियन भाषा) व प्रभारी विभागप्रमुख,
विदेशी भाषा विभाग,
शिवाजी
विद्यापीठ,
कोल्हापूर.
महाराष्ट्र, भारत
डॉ. इंदिरा गजीयेवा
उप-संचालक,
द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज,
रशियन
स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को,
रशिया
(RSUH)
प्रा. रणधीर शिंदे
विभागप्रमुख, मराठी विभाग,
शिवाजी विद्यापीठ,
कोल्हापूर.
महाराष्ट्र. भारत
No comments:
Post a Comment