शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी. |
शिवाजी विद्यापीठात ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी. |
७३व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना अभिवादन करून शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अधिकारी. |
कोल्हापूर, दि. २६ जानेवारी: ७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिन आज
शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या
हस्ते सकाळी ठीक ८ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले.
त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर सर्व
मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन
केले.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी
कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर.
पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.
एस.एस. महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एम.एस. देशमुख, कौशल्य व
उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.
आर.व्ही. गुरव, क्रीडा संचालक डॉ. पी.टी. गायकवाड, बॅ. बाळासाहेब खर्डेकर
ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.
अभय जायभाये यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी
उपस्थित होते. कोविड-१९विषयक नियमांचे काटेकोर पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात
आला. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment