शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाईन कवीसंमेलनात कविता सादर करताना प्रफुल्ल शिलेदार. शेजारी सहभागी कवी. |
कविता सादर करताना सुप्रसिद्ध कवी सौमित्र तथा किशोर कदम. |
कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: येथील शिवाजी विद्यापीठातील मराठी, इतिहास, राज्यशास्त्र ज्ञानमंडळ आणि महाराष्ट्र
राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन
पंधरवड्याच्या निमित्ताने आज (दि. २८) आभासी माध्यमाद्वारे कवी संमेलन संपन्न झाले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के
यांनी कवी संमेलनाचे उद्घाटन केले. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. राजा दिक्षित यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. या कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी झाले. त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच
शेजारच्या गोवा राज्यातील कवीही सहभागी झाले.
कवी प्रफुल्ल शिलेदार, किशोर कदम ऊर्फ सौमित्र, मीनाक्षी पाटील, रमेश इंगळे-उत्रादकर, प्रज्ञा दया पवार, मनोज बोरगावकर, संदिप जगदाळे, जयप्रभू कांबळे, श्रीधर तिवळे, कवयित्री नीरजा आदींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. संमेलनाचे सूत्रसंचालन कवी गोविंद काजरेकर यांनी केले. सर्वच कवींनी वर्तमानाला भिडणाऱ्या, मानवी
जीवनदर्शन घडविणाऱ्या, समकाळावर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या.
ज्येष्ठ कवयित्री निरजा यांनी कवीसंमेलनाचे
अध्यक्षस्थान भूषविले. समकाळातील
कवी साहित्यिक आणि कलाकार यांच्या सांस्कृतिक जबाबदरीचा तसेच वर्तमान स्थितीतील
सांस्कृतिक राजकारणाचा परखड परामर्श घेतला, तसेच
कवितांचेही वाचन केले. संमेलनाचे प्रास्ताविक मराठी
अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे केले. विश्वकोश निर्मिती मंडळाकडून डॉ. जगतानंद भटकर
यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सुस्मिता खुटाळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment