कोल्हापूर, दि.03 सप्टेंबर - राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत ''स्टार्टअप यात्रा - 2022'' चे आगमन आज शिवाजी विद्यापीठात झाले. यात्रेचे स्वागत झेंडा फडकवून मा. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस्. पाटील यांनी केले. आपल्या आजूबाजूला असलेल्या अडचणी दूर करण्याच्या माध्यमातूनच नव्या कल्पना जन्माला येतात. यातून नवे स्टार्टअप सुरू होतात असे दिसून आले आहे. यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा-2022 हे महाराष्ट्र सरकारने पुढे टाकलेले पाऊल आहे. तुमची लहानशी कल्पना असेल तर यामध्ये आवर्जून नोंदवा. पारीतोषीक मिळवणे दुय्यम आहे पण या व्यासपीठाचा उपयोग करून नवव्यवसायात आलात तर संधीचा मार्ग खुला होईल. म्हणून शासनाच्या प्रयत्नांना प्रतिसाद द्या असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.
15 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या यात्रेचे जिल्हयात आतापर्यंत 36 ठिकाणी भेटी दिल्याअसून त्यात 30 स्टार्टअपची नोंद झाली आहे. राज्यभरात ही यात्रा सुरू असून प्रत्येक तालुका, जिल्हयात जाऊन नव्या संकल्पनांना यात्रेत सहभागी केले जात आहे. विविध महाविद्यालये, आयटीआय आणि विद्यापीठात ही यात्रा भेटी देत आहे. आज शिवाजी विद्यापीठात सुरू असणाऱ्या 'एसयुके रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन' या इनक्युबेशन सेंटरला भेट दिली व समाधान व्यक्त केले. त्यानंतर यात्रेचे मार्गदर्शन श्री. प्रद्युम्न आढाव व जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे असिस्टंट कमीशनर श्री. संजय माळी, कौशल्य विकास अधिकारी श्रीमती मोटे यांनी उपस्थीत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक व नागरीकांना स्टार्टअप व शासनाच्या विविध योजनांबाबत माहीती दिली. या यात्रेचे स्वागत करण्याकरीता डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनिश कमलाकर कामत, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, वित व लेखअधिकारी श्री. अजीत चौगुले, नवोपक्रमचे संचालक डॉ. एम. एस. देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, इनक्युबेशन सेंटरचे सीईओ डॉ. पी. डी. राऊत, कौशल्य विकासचे संचालक डॉ. ए. एम् गुरव विविध विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व शिवाजी विद्यापीठाशी संलग्नीत 15 स्टार्टअप उपस्थित होते.
------
तीन स्तरावर काम करणार स्टार्टअप यात्रा, एक लाखाचे अनुदानही मिळणार
·
तालुकास्तरीय प्रचार
व प्रबोधन : यात्रेबाबतची संपूर्ण माहिती,
नाविन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची
माहिती देण्यात येत आहे.
·
16 सप्टेंबर रोजी विद्यापीठात जिल्हास्तरीय
प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण स्पर्धा : प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतची
माहिती, स्थानिक उद्योजक व तज्ञ मार्गदर्शकांच्या टीमची व्याख्याने
आयोजित केली आहेत. नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांच्या सादरीकरणासाठी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. जिल्हास्तरावर
सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्यांना 25,000 रूपयांपर्यंतचे पारिताषिक
दिले जाणार आहे.
·
स्टार्टअप नोंदणी
आणि अधिक माहितीसाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट देण्याचे
आवाहन करण्यात आले.
·
राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची
घोषणा : प्रत्येक सादरीकरण सत्रातील उत्तम 10 कल्पनांचे
राज्यस्तरीय सादरीकरण तज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना 1
लाख रूपयांपर्यंतचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरवण्यात येणार
आहे. अशी यात्रेची माहिती समन्वयक डॉ. एम. एस. देशमुख यांनी दिली.
------
No comments:
Post a Comment