कोल्हापूर, दि.17 सप्टेंबर - केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी श्री.अजित चौगुले, डॉ.भारती पाटील, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.प्रकाश पवार, डॉ.रविंद्र भणगे, उपकुलसचिव डॉ.निलेश बनसोडे यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
----
No comments:
Post a Comment