Friday, 2 September 2022

वि.स. खांडेकर यांना स्मृतिदिनानिमित्त

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 




कोल्हापूर, दि. २ सप्टेंबर: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या ४६ व्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींस अभिवादन करण्यात आले.

आज सकाळी विद्यापीठातील वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे भावपूर्ण वातावरणात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते वि.स. खांडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील,  प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या संचालक डॉ. नीलांबरी जगताप, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ.रणधीर शिंदे, डॉ. तृप्ती करेकट्टी, प्रा. दिपक भादले, डॉ. सुरेंद्र उपरे, उदयसिंह राजेयादव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment