कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर - आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या डॉ.ज्योती जाधव,डॉ.विश्वास बापट, डॉ.सुष्मा पाटील, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment