Tuesday, 13 September 2022

रेशीम शेती पहाणी दौरा शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरेल - प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील

 

कोल्हापूर, दि.13 सप्टेंबर - शिवाजी विद्यापीठ प्राणीशास्त्र विभाग 'संेटर ऑफ इंक्युबेशन इन सेरिकल्चर आणि नाबार्ड बैंक भारत सरकार' यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हयातील 25 शेतकऱ्यांची सहल रेशीम शेती पहाणे दौरा कर्नाटक राज्यामध्ये दिनांक 14 ते 16 सप्टेंबर या दरम्यान केंद्रिय रेशीम संशोधन प्रशिक्षण संस्था मैसूर तसेच मैसूर विद्यापीठ रेशीम संशोधन केंद्र आणि कर्नाटक राज्यातील कुछ खेरदी बाजारपेठ, चॉकी संगोपन केंद्र, प्रगतशील शेतकऱ्यांच्या भेटी तसेच इतर शास्त्रज्ञ संशोधन अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांचा संवाद ठेवण्यात आला आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हयातील चंदगड, राधानगरी, हातकणंगले, करवीर अशा विविध तालुक्यातील निवडक रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये रेशीम शेतीमध्ये काम करणारे पती-पत्नी यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील तसेच विभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख आणि रेशीम शास्त्र प्रमुख डॉ. अधिकराव जाधव यांचे प्रयत्नाने नाबार्ड बैंकेने महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय यांचे प्रयत्नाने कोल्हापूर जिल्हयाचे प्रमुख श्री. आशुतोष जाधव यांनी या दौऱ्यासाठी संपूर्ण खर्च मंजूर केला आहे. या दौऱ्याअंतर्गत शेतकऱ्यांना रेशीम शेतीची गुणवत्ता कोश उत्पादन, तुतीची लागवड त्याचे व्यवस्थापन रोग व्यवस्थापन किडीचे नियंत्रण तसेच एकूणच रेशीम शेतीमध्ये शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञान मिळावे यासाठी या अभ्यास दौऱ्याचा उपयोग केला जाणार आहे.  अशा प्रकारचा राज्यात प्रथमच नाबार्डच्या सहाय्याने शिवाजी विद्यापीठ यांनी शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढीसाठी नवीन संकल्पना राबवली आहे. देश पातळीवर सुध्दा याबाबत रेशीम संचालनालय केंद्रीय रेशीम मंडळ यांचा शिवाजी विद्यापीठाला रेशीम शेतीमध्ये विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यासाठी उपयोग होत आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्हयाचे जिल्हा रेशीम अधिकारी डॉ. भगवान खंडागळे तसेच प्राणीशास्त्र विभागाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि जिल्हयातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आणि सहकार्य मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याला शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील,  प्रभारी कुलसचिव डॉ. व्हि. एन. शिंदे, विभाग प्रमुख आशिष देशमुख, रेशीमशास्त्र समन्वयक डॉ. अधिकराव जाधव तसेच विद्यापीठाचे वित्त लेखा अधिकारी अजित चौगुले, उपकुलसचिव रमेश लिधडे आणि जिल्हा रेशीम अधिकारी डॉ. भगवान खंडागळे, नाबार्डचे जिल्हाप्रमुख आशुतोष जाधव इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे उपस्थितीत या अभ्यास दौऱ्याला हिरवा झेंडा दाखवण्यात आला अभ्यास दौऱ्याची आज विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर सुरूवात करण्यात आली.

-----

No comments:

Post a Comment