कोल्हापूर, दि.3 सप्टेंबर - डॉ.रजनीश कामत यांची डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदी झालेली निवड ही आनंदाची, अभिमानाची आणि प्रेरणादायक गोष्ट आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ.दिगंबर शिर्के यांनी केले.
कुलगुरू डॉ.कामत यांची डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथे कुलगुरू पदी निवड झाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित शुभेच्छा समारंभामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. शिर्के अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के पुढे म्हणाले, डॉ.कामत यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये सायबर सिक्युरीटी सेंटरची स्थापना केली.राष्ट्रीय पातळीवरील नवीन उपक्रम राबवून नवीन कोर्स सुरू केले.दिलेली जबाबदारी ही मोठीच असते, कमी-जास्त अशी काही नसते.कामाची हाताळणी करण्याची कला अवगत असणे आवश्यक आहे. चांगली कामे करणाऱ्यांना उत्तम संधी प्राप्त होते.काम करण्याची अभिजात वृत्ती डॉ.कामत यांच्याकडेे आहे.अतिशय उच्च दर्जाची कामाची निष्ठा बाळगणाऱ्यांकडे जबाबदारी मोठी असते.विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये एकटा कोणी काही करू शकत नाही, त्याला उत्तम पाठबळ लागते.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील म्हणाले, विविध विभागांची जबाबदारी स्विकारून एक चांगली संस्कृती आणि परंपरा डॉ.कामत यांनी विद्यापीठामध्ये निर्माण केली.शिवाजी विद्यापीठामधील ज्ञानाची शिदोरी घेवून ते डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई येथे कुलगुरू पदी कार्यरत झालेले आहेत.
सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू डॉ.रजनीश कमलाकर कामत म्हणाले, माझ्या जडण-घडणीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे फार मोठे योगदान आहे.शिवाजी विद्यापीठाच्या सक्षम प्रशासनाचे राज्यामध्ये खुप मोठे नावलौकीक आहे, आदाराचे स्थान आहे. प्रशासनामध्ये संवाद आणि लेखन हा महत्वाचा भाग आहे, तो आपण आत्मसात केला पाहिजे.शिवाजी विद्यापीठामधील सर्व कुलगुरूंसमवेत काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे माझे जडण-घडण होत गेले.आपण काम करीत असताना ते काम स्वत:चे नसते तर त्याकडे टिमवर्क म्हणून पाहिले पाहिजे.सर्व विभागांमध्ये चांगले सहकारी लाभल्यामुळे मला माझी जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडता आली.नविन शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी क्लस्टर विद्यापीठ काढले जात आहेत.मोठी परंपरा असलेले हे डॉ.होमी भाभा विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ राज्यशासनाचा विभाग असल्यामुळे माझ्यावर खुप मोठी जबाबदारी आहे. शिवाजी विद्यापीठाने केलेल्या संस्कारामुळे हे शिवधनुष्य मी नक्कीच पेलू शकेन.
यावेळी नॅनोसायन्स विभागाचे डॉ.पी.जे.कसबे, इलेक्ट्रॉनिक्स् विभागाचे डॉ.एम.के.भानारकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले.
याप्रसंगी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.एस.देशमुख, विज्ञान
व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, परीक्षा
व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिह जाधव, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.आण्णासाहेब गुरव, इनक्युबेशन
सेंटरचे सीईओ डॉ.पी.डी.राऊत, क्रीडा
अधिविभागाचे संचालक डॉ.शरद बनसोडे, डॉ.व्ही.जे.फुलारी, डॉ.नंदकुमार मोरे यांचेसह संशोधक विद्यार्थी, प्रशासकीय
अधिकारी व सेवक उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment