भटिंडा विद्यापीठ उपविजेते; ‘कुरूक्षेत्र’ तिसऱ्या स्थानी
शिवाजी विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेतील सर्वसाधारण तृतीय क्रमांकाचा चषक कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते स्वीकारताना कुरूक्षेत्र विद्यापीठाचा संघ. |
शिवाजी विद्यापीठाचा कुस्तीपटू अक्षय मंगावडे (निळा जर्सी) याने १२५ किलो वजनी गटात अलवारच्या राजर्षी भर्तृहरी विद्यापीठाच्या गौरव याला हरवून कांस्यपदक पटकावले. |
शिवाजी विद्यापीठाचा अक्षय मंगावडे कांस्यपदकासह |
कोल्हापूर, दि. २४
जानेवारी: शिवाजी विद्यापीठात
गेले तीन दिवस सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती
स्पर्धेत आज रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
शिवाजी विद्यापीठाच्या अक्षय मंगावडे याने १२५ किलो वजनी गटात कांस्य पदक प्राप्त
केले.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, भारतीय विद्यापीठ महासंघाचे
निरीक्षक डॉ. सुरेश कुमार मलिक, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत
राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला.
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत भटिंडा येथील गुरू काशी
विद्यापीठाने द्वितिय स्थान तर कुरुक्षेत्र येथील कुरूक्षेत्र विद्यापीठाने तृतीय
स्थान प्राप्त केले. कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते विजेतेपदाच्या ट्रॉफींचे
वितरण करण्यात आले. यावेळी
विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, कराड येथील प्रकाशबापू पाटील
यांच्यासह स्पर्धा संचालक दिलीप
पवार, तांत्रिक संचालक बंकट
यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री
नवनाथ ढमाळ आदी उपस्थित होते. डॉ.
विजय रोकडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले, तर क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे
यांनी आभार मानले.
स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे दहा कुस्तीपटू सहभागी झाले. त्यांनी उत्तम
कामगिरीचे प्रदर्शन केले. अक्षय मंगावडे याने १२५ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक
पटकावून विद्यापीठास कांस्य पदक मिळवून दिले. तो कोतोली- माळवाडी येथील श्रीपतराव
चौगुले कला व वाणिज्य महाविद्यालयाचा खेळाडू आहे.
स्पर्धेत विविध वजनी गटांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या
कुस्तीपटूंची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे:-
५७ किलो: सतीश (चौधरी बन्सीलाल विद्यापीठ, भिवानी) सुमित (इंदिरा गांधी विद्यापीठ, मिरपूर हरियाणा) अमितकुमार (गुरुग्राम विद्यापीठ, गुरुग्राम) सुनिल (ओ.पी.जे.एस. विद्यापीठ, चिरु, राजस्थान).
६१ किलो: सुधीर जाट (बीर टिकेंद्रजी विद्यापीठ, मणीपुर), आशिष
(इंदिरा गांधी विद्यापीठ, हरियाणा), लोकपाल गोहर (देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर), उदित (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक).
६५ किलो: जसकरण सिंग
(पंजाबी विद्यापीठ, पटियाला), रोहित (बीर टिकेंद्रजित विद्यापीठ, मणीपूर), आयुष कुमार (छ. चरणसिंग विद्यापीठ, मेरठ), सचिन दहीया (पंजाब विद्यापीठ, चंदिगड).
७० किलो: परवेंदर (लवली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा), विजय मलिक (चंदिगड विद्यापीठ, मोहाली), राकेश कुमार (सिंघानिया विद्यापीठ, झुनझुनु, राजस्थान), सौरभ सेहावत (गुरु काशी विद्यापीठ, भटिंडा).
७४ किलो: रविराज चव्हाण (पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), मोहीत (देश भगत विद्यापीठ, मंडी गोविंदग्राम, पंजाब), दीपक (गुरु जंबेश्वर विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ, हिस्सार, हरियाणा), दिपक (कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र).
७९ किलो: सागर जगलान (कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरुक्षेत्र), अनिकेत
(महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक),
अनुज कुमार (छत्रपती चरणसिंग विद्यापीठ,
मेरठ), मुकुल मिश्रा (जननायक चंद्रशेखर विद्यापीठ, बल्लिया).
८६ किलो: संदिप (चित्करा विद्यापीठ, राजपुरा पंजाब), एम.एम. सरनोबत (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड),
प्रतीक जगताप (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), संजीव (गुरु काशी
विद्यापीठ, भटिंडा)
९२ किलो: अजय (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), अंकित (इंदिरा गांधी विद्यापीठ, मीरपूर, हरियाणा), पवन (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर), आशिष (कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र).
९७ किलो: साहील (गुरु काशी विद्यापीठ, भटिंडा), अभिषेक खोखर (छ. चरणसिंग विद्यापीठ, मेरठ),
आकाश (चित्करा विद्यापीठ, रायपुर, पंजाब), दिपक कुमार (कलिंगा विद्यापीठ, छत्तीसगढ)
१२५ किलो: अनिरूद्ध कुमार (महर्षी दयानंद विद्यापीठ,
रोहतक), आकाश अंतिल (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा), अमन (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर), अक्षय एस. मंगावडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या या कुस्ती स्पर्धा अत्यंत निकोप व
पारदर्शक पद्धतीने पार पडल्या असून ग्रीको-रोमन स्पर्धांमध्येही हीच पारदर्शकता
जोपासली जाईल, अशी ग्वाही भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेश कुमार
मलिक यांनी आज फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या समारोप समारंभात बोलताना दिली.
डॉ. मलिक यांनी शिवाजी विद्यापीठाने पाहुण्या खेळाडूंना उत्तम सोयीसुविधा
पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. याउपरही काही उणीव भासली असल्यास तसे सांगावे, जेणे
करून पुढील स्पर्धेदरम्यान ती दूर करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
‘खेळाडूंना डोपिंगच्या
दुष्परिणामांची जाणीव करून द्या’
डोपिंगसदृश प्रकार झाल्यास संघ व्यवस्थापकांनी तातडीने ते निदर्शनास आणावेत. अशा
कोणत्याही गैरप्रकारांबाबत एआययू अत्यंत गंभीर आहे. डोपिंगमुळे खेळाडूंच्या
भवितव्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. कारकीर्द धोक्यात येऊ शकते, याची जाणीव
त्यांना करून द्यावी. खेळाडूंना योग्य मार्गाने यश मिळविण्यास उद्युक्त करा, असे
आवाहनही डॉ. मलिक यांनी या प्रसंगी केले.
No comments:
Post a Comment