Thursday 12 January 2023

स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊंना

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

 


कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रसासकीय भवनामध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, आजीवन अध्ययन विभागाचे डॉ. रामचंद्र पवार, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ. एस.एन. सपली यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment