कोल्हापूर, दि. ३
जानेवारी: क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विलास
शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्व उपस्थितांना शुभेच्छा
दिल्या. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी
विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे,
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. कैलास
सोनवणे, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. कविता ओझा, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. कविता वड्राळे,
डॉ. प्रमोद पांडव, संध्या अडसुळे, भक्ती नाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व
विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment