कोल्हापूर, दि. २५
जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आज १३व्या राष्ट्रीय मतदार
दिवसानिमित्त लोकशाही परंपरांचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिज्ञा ग्रहण उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यापीठाच्या
‘इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अँड
इलेक्शन्स फॉर गुड गव्हर्नन्स’च्या
वतीने कार्यक्रम झाला.
केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी मतदारांसाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन
केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे
संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख,
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.
रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा
संचालक डॉ. शरद बनसोडे, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, मराठी अधिविभाग
प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. तृप्ती करेकट्टी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment