कोल्हापूर, दि.23 ऑगस्ट - शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे उपस्थितांना चंद्राच्या पृष्ठभागावर ''चांद्रयान - 3'' च्या लॅंडींगचे थेट प्रक्षेपण सायंकाळी 5.30 ते 6.30 या कालावधीत एकत्रित पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्याचबरोबर,
विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृह आणि पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्र येथेही ''चांद्रयान - 3'' च्या लॅंडींगचे थेट प्रक्षेपण पाहण्याची सुविधा करण्यात आली.
''चांद्रयान - 3'' च्या लॅंडींगनंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने भरलेले संपूर्ण
सभागृह भारत मातेच्या जयघोषाने दणाणून गेले.
या एेतिहासिक प्रसंगी राजर्षी शाहू सभागृह येथे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ.शरद बनसोडे, डॉ.प्रकाश गायकवाड, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.रामचंद्र पवार, डॉ.डी.के.गायकवाड, उपकुलसचिव डॉ.वैभव ढेरे, डॉ.प्रिया देशमुख, डॉ.अभिजीत रेडेकर यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, संशोधक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, अधिविभागप्रमुख, संचालक, समन्वयक, विज्ञानप्रेमी जिज्ञासू नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
--------
No comments:
Post a Comment