शिवाजी विद्यापीठात 'मेरी मिट्टी, मेरा देश' या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
शिवाजी विद्यापीठात 'मेरी मिट्टी, मेरा देश' या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात सादरीकरण करताना संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
शिवाजी विद्यापीठात 'मेरी मिट्टी, मेरा देश' या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात संतूरवादन सादर करताना सोहम जगताप. |
कोल्हापूर, दि. १४
ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात आजची भारतीय स्वातंत्र्यदिनाची
पूर्वसंध्या सुमधूर देशभक्तीपर गीतांच्या सुरांमध्ये न्हाऊन निघाली. निमित्त होते
संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित करण्यात आलेल्या ‘मेरी
मिट्टी, मेरा देश’
या सांगितिक कार्यक्रमाचे!
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहामध्ये आज सायंकाळी संगीत व
नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत मराठी, हिंदी देशभक्तीपर गीतांचा
लाजवाब कार्यक्रम सादर केला. ‘सैनिक
हो तुमच्यासाठी’
या गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात शूर आम्ही
सरदार, सारे जहाँ से अच्छा, हे ईश्वर या अल्ला, दे दी हमें आजादी, हर करम अपना
करेंगे, मेरे देश की धरती, वंदे मातरम्, जिंदगी मौत ना बन जाए, संदेसे आते हैं,
देस रंगीला, सागरा प्राण तळमळला आदी गीते संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केली. सोहम जगताप यांच्या संतूरवादनाने
कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमामध्ये प्रशांत देसाई व संदेश गावंदे (तबला), आकाश
साळोखे (कीबोर्ड), मनोज जोशी (ऑक्टोपॅड) आदींनी संगीतसाथ केली. विश्वराज जोशी
यांनी सूत्रसंचालन केले. संगीत
अधिविभाग प्रमुख डॉ. अंजली निगवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विनोद ठाकूर-देसाई
आणि डॉ. निखिल भगत यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव
डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. सरिता
ठकार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक
डॉ. प्रकाश गायकवाड आदींनी पूर्ण वेळ उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment