कोल्हापूर, दि.29 ऑगस्ट - जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम व राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत मेजर ध्यानचंद यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ.शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.तानाजी चौगुले, आजीवन अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, डॉ.इरण्णा उडचण, योगेश मांगुरे-पाटील, किरण पाटील, जालंदर मेंढे, यांचेसह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, खेळाडू मोठया प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment