Tuesday 29 August 2023

मिनी मॅराथॉने स्पर्धेत 400 स्पर्धकांचा सहभाग; विजेत्यांना गौरवले

 कोल्हापूर, दि.29 ऑगस्ट - जी-20 युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांची जयंती निमित्त शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागामार्फत मिनी मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत 400 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये नियमित धावपटू, खेळाडू, संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक हे मोठया उत्साहाने सहभागी झाले.

       विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनासमोर ध्वज दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला.आपल्या राष्ट्राच्या गौरवासाठी धावा हा संदेश घेवून मानव्यशास्त्र इमारत मार्गे धावत हे स्पर्धक मुलींचे वसतिगृह, कुलगुरू निवासस्थान, दूरशिक्षण केंद्र, क्रीडा अधिविभाग, क्रांतीवन, मुलांचे वसतिगृह, परीक्षा भवन, भाषा भवन, रसायनशास्त्र अधिविभाग, मुख्य इमारतीच्या समोरील आश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळया समोरून राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय सभागृह येथे येवून स्पर्धेची सांगता झाली.

         स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे - मुलांमध्ये पहिला क्रमांक तुकाराम मोरे (अर्थशास्त्र), दुसरा क्रमांक विजय बाजबाळकर (बी.लीप), तिसरा क्रमांक मयुरेश हासोळकर (इतिहास), चौथा क्रमांक विठ्ठल मोटे (इंग्रजी), पाचव़ा़ क्रमांक अशुतोष हंकारे (औद्योगीक रसायनशास्त्र), मुलींमध्ये पहिल क्रमांक प्रेरणा घाडगे (तंत्रज्ञान), दुसरा क्रमांक विजया कालोले (तंत्रज्ञान), तिसरा क्रमांक प्रज्ञा पाटील (रसायनशास्त्र), चौथा क्रमांक तृप्ती इंगळे (इंग्रजी), पाचवा क्रमांक अपर्णा फाळके (वनस्पतीशास्त्र). त्याचबरोबर, अधिविभागातील शिक्षक, प्रशासकीय सेवक पुढील प्रमाणे - डॉ.सागर डेळेकर, डॉ.गजानन राशिनकर, लक्ष्मण परीट (रसायनशास्त्र), डॉ.एस.एम.पाटील (वनस्पतीशास्त्र), नितीन नाईक (सुक्ष्मजीवशास्त्र), प्रशांत जाधव (विद्यापीठ ग्राहक भांडार), डॉ.निलांबरी जगताप (मराठा इतिहास), अनुप्रीया तरवाळ (रसायनशास्त्र).

-----

No comments:

Post a Comment