Tuesday, 15 August 2023

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 


शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनचे 'फ्लॅगऑफ'ने उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित सायकल रॅलीचे 'फ्लॅगऑफ'ने उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह अन्य अधिकारी.

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेनेची मानवंदना स्वीकारताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह अन्य अधिकारी.



कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात ७७वा स्वातंत्र्यदिन आज मॅरेथॉन, रॅली आदी उपक्रमांसह मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

आज सकाळी ठीक आठ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजास वंदन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या परेडद्वारे राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत यांचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी मेरी मिट्टी, मेरा देश उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वातंत्र्यदिन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. तसेच, तंत्रज्ञान अधिविभाग व क्रीडा विभागाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते फ्लॅग-ऑफ करून प्रारंभ करण्यात आला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, अधिविभाग प्रमुख, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहापानाने या उपक्रमांची सांगता झाली.

No comments:

Post a Comment