कोल्हापूर, दि. १८
ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात आज
शांती व अहिंसा यांची शपथ घेत सद्भावना दिन साजरा करण्यात आला.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी
सर्व उपस्थितांना सद्भावना शपथ दिली. यावेळी प्रख्यात संशोधक डॉ. नानासाहेब थोरात
यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक
डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण
महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ.
दत्तात्रय गायकवाड आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment