कोल्हापूर, दि. ३ जुलै:
शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि क्रीडाई, कोल्हापूर यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
उद्योगांना आवश्यक कुशल अभियंते, ज्ञान व
तंत्रज्ञान यांची निर्मिती करणे, विद्यार्थ्यांना
औद्योगिक प्रशिक्षण देणे असा या सामंजस्य कराराचा हेतू आहे.
विद्यार्थ्यांनी सामाजिक, पर्यावरणीय
प्रश्न घेवून त्या अनुषंगिक प्रकल्प हाती घ्यावेत व त्याची उकल करण्यास क्रीडाई
संस्थेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांनी याप्रसंगी केले.
तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थ्यांना सद्यपरिस्थितीत बांधकामातील ज्वलंत
प्रश्नांची जाणीव होवून, त्यांना
प्रत्यक्ष बांधकामाचा अनुभव क्रीडाईच्या माध्यमातून मिळेल, अशी ग्वाही क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी दिली.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील
यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठातर्फे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे,
तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस. एन.
सपली व डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी तर क्रीडाईतर्फे अध्यक्ष के.पी. खोत व सचिव संदीप मिरजकर यांनी
स्वाक्षरी केल्या.
तंत्रज्ञान अधिविभागातील सिव्हील शाखेचे समन्वयक महेश साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पुनश्री फडणीस यांनी आभार मानले. यावेळी डॉ. व्ही. एस. पाटील, श्रीकांत भोसले, क्रीडाईचे सहसचिव गणेश सावंत, विजय माणगांवकर, विश्वजित जाधव व आदित्य बेडेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment