Tuesday, 1 August 2023

शिवाजी विद्यापीठात अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात



कोल्हापूर, दि. ११ एप्रिल: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment