Thursday 3 August 2023

क्रांतीसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त विद्यापीठात अभिवादन

 


कोल्हापूर, दि. जुलै: क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.तानाजी चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, डॉ.प्रकाश राऊत, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.आशिष देशमुख, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. महादेव भिलावे, डॉ. सुनिल गायकवाड, डॉ. ए.डी. गोफणे, डॉ. वाय.के. माने, जे.के. सुरकुले, एस.पी. माने, एस.आर. पवार, डी.ए. पोतदार, पी.आर. चौगुले यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment