शिवाजी विद्यापीठाचे नियोजन; शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन वाचणार
कोल्हापूर, दि. ११ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी भारतरत्न डॉ.
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो.
यंदाच्या वर्षापासून त्याची व्याप्ती महाविद्यालयांपर्यंत वाढवून सर्व संबंधित
घटकांना सामावून घेऊन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १५
ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११ वा. या कालावधीत हा उपक्रम विद्यापीठासह सर्व
संलग्नित महाविद्यालयांत एकाच वेळी राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.
विलास शिंदे यांनी दिली आहे.
कुलसचिव डॉ. शिंदे यांनी
दिलेल्या माहितीनुसार, वाचन ही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासामध्ये भूमिका बजावणारी
अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. वाचनामुळे मनुष्य ज्ञानसंपन्न होतो आणि त्याच्या
व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने
दरवर्षी १५ ऑक्टोबर ही भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन
प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार
मंडळाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाचे सर्व आधिविभाग व सर्व
संलग्नित महाविद्यालयातील सर्व घटकांचा या उपक्रमात समावेश करण्याचे ठरवले आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने
अधिविभाग प्रमुख व प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाबाबत अवगत
करावे आणि या वाचन प्रेरणा दिनाचे नियोजन शिस्तबद्धरित्या मोठ्या प्रमाणावर करावे.
यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने यावर्षी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून महाराजांच्या राज्याभिषेक
सोहळ्याचे वर्णन असणारा मजकूर विद्यापीठामार्फत सर्व अधिविभाग व महाविद्यालयांना
पाठविण्यात येईल. त्याचे सर्वांनी वाचन करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये
विद्यार्थी, शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी इत्यादी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यापीठाने तयार करून
पाठविलेल्या नियमावलीचेही तंतोतंत पालन करावे, असेही
डॉ. शिंदे यांनी कळविले आहे.
***
वाचन प्रेरणा दिन साजरा
करण्याच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या बॅ. खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रामार्फत तयार
करण्यात आलेली नियमावली पुढीलप्रमाणे-
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.
पी. जे. अब्दुल कलाम यांना सार्थ आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन
२०१५ पासून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर
हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून
साजरा करण्याचे घोषित केले आहे. यानुसार सन २०१५ पासून शिवाजी विद्यापीठामध्ये
वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहाने व अत्यंत उत्तम पद्धतीने साजरा केला जातो.
वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही
सातत्याने चालणारी प्रक्रिया असून ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाजाची जडण घडण, व्यक्तिमत्व
विकास, साहित्य विकास आणि भाषा विकास यासाठी वाचन संस्कृतीचा
विस्तार व विकास अत्यावश्यक असल्यामुळे वाचन प्रेरणा दिन उपक्रम उत्साहात साजरा
करणे गरजेचे आहे.
सदर उपक्रमाच्या अनुषंगाने
विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी विद्यापीठातील विविध अधिविभाग
व संलग्नित महाविद्यालयातील सर्व घटकांनी विद्यापीठाने
निश्चित केलेल्या मजकुराचे १५ मिनिटे वाचन करावे. या वाचन प्रेरणा दिवसाच्या
अनुषंगाने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे
वाचन करावे.
उपरोक्त ठरावाच्या अनुषंगाने दि. १५
ऑक्टोबर, २०२४ रोजी विद्यापीठातील सर्व अधिविभाग, सेंटर, चेअर व
सर्व संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर
सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी
इ. घटकांनी सकाळी १०.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या
राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या मजकुराचे
वाचन करावे. याबाबतची नियमावली पुढीलप्रमाणे आहे
१. दि. १५ ऑक्टोबर,२०२४
रोजी विद्यापीठातील सर्व अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयांनी त्यांच्या
महाविद्यालयाच्या नावांसहित ‘वाचन प्रेरणा दिन’ असा बॅनर
तयार करून घ्यावा व कार्यक्रम साजरा करताना तो योग्य
ठिकाणी सर्वांच्या निदर्शनास येईल अशा पद्धतीने लावून घ्यावा.
२. दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.०० यादरम्यान
या उपक्रमाचे आयोजन करावे. यामध्ये सकाळी १०.३० ते १०.४५ या वेळेत भारतरत्न डॉ. ए.
पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करावे व सकाळी
१०.४५ ते ११.०० या वेळेत प्रत्यक्ष वाचन करावे.
३. सदर कार्यक्रमामध्ये सर्व अधि
विभाग प्रमुख, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी, संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर
सेवक, माजी विद्यार्थी इ. यांचा सहभाग व्हावा या दृष्टीने अधिविभागप्रमुख
व महाविद्यालयीन पातळीवर प्राचार्य यांनी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा
दिन कार्यक्रमाबाबत अवगत करावे व कार्यक्रमाची रूपरेषा त्यांना अगोदर कळवण्यात
यावी. परिपत्रकात या दिवशी विद्यार्थांची १००% हजेरी बंधनकारक राहील, असेही नमूद
करावे.
४. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी महाविद्यालयातील
सदर कार्यक्रमाकरिता उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, संस्थाचालक
व माजी विद्यार्थी यांचा सहभाग नोंदवून घ्यावा.
५. सर्व
महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर
कार्यक्रमातील सहभागी लोकांची संख्या ,कार्यक्रमाची छायाचित्रे, व
कार्यक्रमाची चित्रफीत (Video)
YouTube वर अपलोड
करून त्याची लिंक विद्यापीठाने महाविद्यालयाला संलग्नीकरणाबाबत माहिती भरण्यासाठी
दिलेल्या संगणक प्रणाली मध्ये भरावी.
याची लिंक पुढीलप्रमाणे आहे .https://sukapps.unishivaji.ac.in/onlineaffiliation/#/login
६. हा
कार्यक्रम संलग्नित महाविद्यालयातील ग्रंथालय, राष्ट्रीय
सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या सहभागाने आयोजित करावा. सहभागी
विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या मोठ्या हॉलमध्ये बसवावे. इतर विद्यार्थी, शिक्षक
शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी यांनी उपलब्ध खोल्यांमध्ये बसून वाचन करावे छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा पाठवलेला मजकूर सर्व सहभागी लोकांना
त्यांच्या मोबाईलवर, मोठ्या स्क्रीनवर किंवा हार्ड कॉपी इत्यादी स्वरूपात
उपलब्ध करून द्यावा.
७. हा
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अधिविभाग, महाविद्यालयीन पातळीवर समितीचे गठन करावे.
८. सदर
कार्यक्रमाचे आयोजन करताना सदर नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
No comments:
Post a Comment