शिवाजी विद्यापीठात मानसिक आरोग्य सप्ताह उत्साहात
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात पथनाट्य सादर करताना मानसशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
कोल्हापूर, दि. १४ ऑक्टोबर - आजच्या काळात शिक्षण व करिअरच्या दृष्टीने
युवकांचे मानसिक आरोग्य चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात
जनजागृती निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांनी नुकतेच केले.
शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र अधिविभाग आणि व्यवसाय मार्गदर्शन
व मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे
औचित्य साधून मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोस्टर
प्रदर्शन, जनजागृती रॅली व पथनाटय आदी उपक्रम आयोजित करण्यात आले. त्यावेळी कुलगुरू
डॉ.शिर्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील यांच्या हस्ते झाले. मानसशास्त्र अधिविभागातील पोस्टर प्रदर्शन स्पर्धेतील
विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर
विद्यापीठ परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील,
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन,
आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, मानसशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. अश्विनी
पाटील, समुपदेशक उर्मिला शुभंकर, मिलींद
सावंत, साक्षी गावडे, विशाल पाटील यांच्यासह
विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment