![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. स्वप्नील बंगाली |
![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. स्वप्नील बंगाली आणि डॉ. विवेक धुपदाळे यांच्यासमवेत उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थी |
कोल्हापूर, दि. १ मार्च: कायद्याच्या
उपयोजनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश शक्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध
कायदेतज्ज्ञ डॉ. स्वप्नील बंगाली यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या विधी
अधिविभामध्ये पीएम-उषा योजनेअंतर्गत ‘व्हॅल्यू अॅडेड कोर्स ऑन
ज्युडिशियल एक्झॅमिनेशन ट्रेनिंग’ या विषयावरील दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख
पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी विधी अधिविभागाचे प्रमुख डॉ. विवेक
धुपदाळे होते.
डॉ. बंगाली म्हणाले, कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाने आज सर्व क्षेत्रे व्यापली आहेत. या तंत्रज्ञानाचा
कायद्याच्या क्षेत्रातही अत्यंत सकारात्मक वापर करून घेता येणे शक्य आहे. न्यायदानाची
प्रक्रिया गतिमान होण्याच्या दृष्टीने न्यायपालिका नवतंत्रज्ञानाबाबत अत्यंत गंभीर
आणि सकारामक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसऱ्या सत्रात अॅड. संदीप मुतालिक (सांगली)
यांनी कामगार न्यायालयाशी संबंधित कायद्यांची सविस्तर माहिती दिली. तिसऱ्या सत्रात
डॉ. बंगाली यांनी “इंटरनेट ऑफ थिंग्स” या विषयावरही मार्गदर्शन केले. चौथ्या
सत्रातही त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व
शंकासमाधानही केले.
यावेळी डॉ. आर. नारायणा, सुवर्णा कांबळे,
अक्षय कोल्हापुरे, आकाश कुंभार, पूजा लोहार, वैष्णवी माळी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment