कोल्हापूर, दि. १ मार्च: विज्ञान साहित्य वर्तमानावर प्रकाश टाकून
भविष्याचा वेध घेत असते, असे
प्रतिपादन प्रा. शिवकुमार
सोनाळकर यांनी आज केले.
राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय
विज्ञान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि मराठी अधिविभाग आयोजित
‘मराठी विज्ञान साहित्य’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत
होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी होते.
प्रा. सोनाळकर म्हणाले, विज्ञान साहित्य कल्पित वास्तवावर
आधारलेले असते. विज्ञान साहित्यात जीवनाच्या सर्व धारा
समाविष्ट असतात. विज्ञान
साहित्यातून बौद्धिक आणि कलात्मक स्वरूपाचा आनंद मिळतो.
डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, विज्ञान साहित्याकडे वाचकांनी डोळसपणे पाहिले पाहिजे. लेखकाची कल्पना हा विज्ञानातला नवा शोध
असतो.
विज्ञानसाहित्याच्या केंद्रस्थानी माणूसच असतो. त्यामुळे विज्ञान साहित्य मानवी जीवनाचा वेध घेते.
रसायनशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल देशमुख यांनी आभार मानले. इंग्रजी अधिविभाग
प्रमुख डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. दीपक भादले यांच्यासह विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
No comments:
Post a Comment