समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासमवेत सहभागी विद्यार्थी, परीक्षक आणि शिक्षक |
![]() |
समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. दिनेश अरोरा, डॉ. वैशाली पवार, डॉ. तानाजी चौगुले आदी |
![]() |
(फोटोओळ- उपरोक्त ३ फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठात आयोजित समूह युवा संसद स्पर्धेत सादरीकरण करताना शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी |
कोल्हापूर, दि. २५ मार्च: केवळ राज्यशास्त्राच्याच नव्हे, तर सर्वच अभ्यासक्रमांच्या
विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धतीचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा, असे आवाहन
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. संसदीय कार्य
मंत्रालयाच्या वतीने आयोजित समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन
प्रसंगी ते काल (दि. २४) बोलत होते.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, संसदीय
राजकारण हा सार्वत्रिक अभ्यासाचा विषय आहे. संविधानिक मूल्यांचे जतन
करण्यासाठी विद्यार्थ्यांना युवा संसदसारख्या उपक्रमातून चालना मिळते.
या स्पर्धेचे मूल्यांकन
करण्यासाठी जालंधर (पंजाब) येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयाचे डॉ. दिनेश अरोरा (समूह समन्वयक) आणि
पुण्याच्या श्री शाहू विद्यामंदिर महाविद्यालयाच्या डॉ. वैशाली पवार (शिक्षणतज्ज्ञ परीक्षक) उपस्थित
होते. शपथविधीपासून ते कायदानिर्मिती प्रक्रियेपर्यंत सर्व घटकांचा समावेश असलेल्या या उपक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उत्तम सादरीकरण केले. यावेळी गायत्री सोनवणे,
तेजस सन्मुख, संदेश लडकट, श्रेया म्हापसेकर, स्वप्नील माने, विश्वजित पाटील या सहा विद्यार्थ्यांची उत्कृष्ट संसदरत्न
म्हणून निवड करण्यात आली. कुलसचिव डॉ.
विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, सुरेखा आडके
यांच्यासह शिक्षक,
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. प्रल्हाद माने
यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. संतोष सुतार, डॉ. कविता वड्राळे, आकाश ब्राह्मणे, डॉ. अतुल जाधव आदींनी संयोजन केले.
No comments:
Post a Comment