![]() |
शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात नॅनो सायन्स आणि एम.बी.ए. अधिविभागाच्या मुलींमधील क्रिकेट सामना |
![]() |
शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात संगणकशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान अधिविभागांच्या विद्यार्थ्यांमधील बॅडमिंटन सामन्यातील एक क्षण |
कोल्हापूर, दि. ४ मार्च: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन
वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५मध्ये गतवर्षीप्रमाणेच यंदाही तंत्रज्ञान
अधिविभागाच्या क्रीडापटूंनी विविध स्पर्धांत चमक दाखविण्यास सुरवात केली आहे.
काल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानंतर आज बुद्धीबळासह बॅडमिंटन
स्पर्धेत तंत्रज्ञान अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केले. या
अधिविभागाच्या धैर्यशील सरनोबतने बुद्धिबळ पुरूष गटात तर प्रतीक्षा गोसावीने महिला
गटात प्रथम क्रमांक मिळविला. बुद्धीबळ पुरूष गटात अर्थशास्त्र अधिविभागाच्या अभिजीत
खोपकरने द्वितिय, तर क्रीडा अधिविभागाच्या राहुल लोखंडेने तृतीय क्रमांक मिळविला.
महिला गटात समाजशास्त्राच्या स्नेहल खामकरने द्वितिय तर गणितशास्त्रच्या गीता
पांढरेने तृतीय क्रमांक मिळविला.
पुरूष बॅडमिंटनचीही अंतिम फेरी आज झाली. यामध्ये तंत्रज्ञान अधिविभाग,
अर्थशास्त्र अधिविभाग आणि जैव तंत्रज्ञान अधिविभाग यांनी अनुक्रमे क्रमांक
पटकावले.
पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेत आज यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल
डेव्हलपमेंट, एम.बी.ए., इतिहास, कॉम्प्युटर सायन्स, क्रीडा
अधिविभाग, रसायनशास्त्र
या अधिविभागांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश केला.
तर, महिला क्रिकेट स्पर्धेत यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, इतिहास, तंत्रज्ञान, भौतिकशास्त्र,
पर्यावरणशास्त्र, नॅनो सायन्स, गणितशास्त्र,
राज्यशास्त्र, प्राणीशास्त्र या अधिविभागांनी
पुढील फेरीत प्रवेश केला.
पुरूषांच्या कबड्डी स्पर्धेत इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, क्रीडा
अधिविभाग, ए.जी.पी.एम., संगणकशास्त्र,
भौतिकशास्त्र या अधिविभागांनी पुढील फेरीत प्रवेश केला.
उद्या, बुधवारी (दि. ५) क्रिकेट (पुरुष व महिला), कबड्डी (पुरुष व महिला), बास्केटबॉल (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (पुरुष) तसेच अॅथलेटिक्स (महिला व पुरुष) स्पर्धा होणार आहेत.
No comments:
Post a Comment