कोल्हापूर, दि.03 मार्च - शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी गेली तीन वर्षे शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण अधिविभागामार्फत
आयोजित ^शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव 2024-25* च्या उद्धाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ.शिर्के बोलत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील
यांची प्रमुख उपस्थिती होती.
तदनंतर, क्रीडापटूंचे उत्कृष्ट संचलन, विविध क्रीडाप्रकारांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आणि ज्योत प्रज्वलन या उपक्रमांनी आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या तिसऱ्या 'शिवस्पंदन क्रीडा महोत्सव-2025' चे शानदार उद्धाटन करण्यात आले. मैदानी स्पर्घा, बास्केटबॉल,
बॅडमिंटन, बुध्दिबळ, कबड्डी, हॉलिबॉल, क्रीकेट अशा सात क्रीडाप्रकारांमध्ये खेळाडू सहभागी झालेले आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी रोपटयास पाणी वाहून शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाचे उद्धाटन तसेच ध्वजवंदन केले. त्यानंतर विद्यापीठाच्या विविध 30 अधिविभागातील 2300 क्रीडापटूंनी उत्कृष्ट संचलन केले.
यावेळी विद्यापीठाची शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू स्वप्नाली वायदंडे हिच्या हस्ते उद्धाटनस्थळी क्रीडा ज्योतीचे आगमन झाले आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवस्पंदन स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करण्यात आली.यावेळी क्रीडापटूंनी जिम्नॅशियम, योगा, मल्लखांब,
धर्नुविद्या, घोडेस्वारी या क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.आकाशात फुगे सोडून औपचारिक उद्धाटन झाल्याचे घोषित केले.स्वप्नाली वायदंडे हिने सहभागी खेळाडूंना शपथ दिली.क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे यांनी प्रास्ताविक केले.डॉ.एन.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.किरण पाटील यांनी आभार मानले.यावेळी अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.महादेव देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजितसिंह जाधव, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ.सागर डेळेकर, आजीवन अध्ययन केेंद्राचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.तानाजी चौगुले, डॉ.तृप्ती करेकट्टी, डॉ.राजेंद्र सोनकवडे, डॉ.आण्णासाहेब मोहळकर, डॉ.केशू राजपुरे, डॉ राजाराम गुरव, डॉ राहुल माने,
डॉ प्रशांत पाटील, डॉ राजेंद्र रायकर, डॉ धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment