Sunday, 15 June 2025

'सायन्स बिहाइंड स्पोर्ट्स' चर्चासत्राला

क्रीडापटूंचा उत्साही प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित क्रीडा चर्चासत्रात मार्गदर्शन करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. शरद बनसोडे, स्वागत परूळेकर, सिद्धार्थ शिंदे, डॉ. महादेव देशमुख, ऋषिकेश जांभळे, अनघा देशपांडे आणि शुभम आगळे.
 
चर्चासत्रास उपस्थित क्रीडा प्रशिक्षक, पालक आणि क्रीडापटू.



कोल्हापूर, दि. १५ जून: शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागातर्फे आज क्रीडापटूंसाठी स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजीच्या माध्यमातून स्टॅमिना, रिकव्हरी, फोकस आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी 'सायन्स बिहाइंड स्पोर्ट्स' या विषयावर विशेष एकदिवसीय चर्चासत्र यशस्वीरित्या संपन्न झाले. या चर्चासत्राला क्रीडापटूंचा उत्साही प्रतिसाद लाभला.

सदर चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमास विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ महादेव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर आणि क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे , आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुभाष पवार, डॉ. धनंजय पाटील उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी खेळाडूंना स्पोर्ट्स सायन्स व क्रीडा क्षेत्रात करियर करण्याची सुवर्णसंधी विद्यापीठामार्फत उपलब्ध असल्याचे सांगितले. खेळाडूंच्या आयुष्यात विज्ञानाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.

सिद्धार्थ शिंदे यांनी खेळाडूंना देशाचे नाव उंचावण्यासाठी मेहनत करण्याचे आवाहन केले तसेच डोपिंगपासून दूर राहण्याचाही सल्ला दिला.

क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, सोई सुविधा व बी ए स्पोर्ट्स अभ्यासक्रमाची माहिती दिली.

क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ अनघा देशपांडे यांनी स्पोर्ट्स सायकोलॉजी या विषयाचे महत्व पटवून दिले आणि मानसिक तणावातून बाहेर कसे पडायचे आणि उत्तम कामगिरी कशी करायची या विषयी मार्गदर्शन केले. आहार तज्ज्ञ ऋषिकेश जांभळे आणि शुभम आगळे यांनी 'स्पोर्ट्स ॲन्ड न्यूट्रिशन' या विषयावर मार्गदर्शन केले.  सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती मनिषा शिंदे यांनी केले तर सुचय खोपडे यांनी आभार मानले. चर्चासत्रास खेळाडू,पालक, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment