![]() |
| शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ करवीर यांचा 'करवीर भूषण' पुरस्कार प्रदान करताना राजूभाई दोशी. सोबत क्लबचे पदाधिकारी व सदस्य. |
कोल्हापूर, दि. २७ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विज्ञान
लेखक डॉ. विलास शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने नुकताच ‘करवीर भूषण’ पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे ३६ व्या
चार्टर नाईट सोहळा झाला. या प्रसंगी क्लबचा "करवीर भूषण" हा प्रतिष्ठेचा
पुरस्कार कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना राजूभाई दोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,
सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. शिंदे यांनी
शिक्षण, प्रशासन व पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा
सन्मान करण्यात आला.
डॉ. विलास शिंदे यांनी पुरस्काराबद्दल रोटरी क्लब ऑफ करवीरचे आभार मानले.
आज खऱ्या अर्थाने आज करवीरवासी झाल्यासारखे वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त
केली.
क्लबचे असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी यांनी क्लबने वर्षभर विविध
केलेल्या कार्याचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रमुख पाहुणे राजूभाई दोशी
यांनी रोटरी क्लब ऑफ करवीरने गेल्या पस्तीस वर्षांमध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य केले
आहे. भविष्यात क्लबमार्फत एखादा समाजोपयोगी कायमस्वरुपी भरीव प्रकल्प उभा
करण्यासंदर्भात विचारविमर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुरवातीला क्लबचे अध्यक्ष कुशल पटेल यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन
स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पर्यावरणविषयक
लघुपट 'फाकड्या'चे प्रदर्शन करण्यात आले. त्याचे निर्माते व
अभिनेते उत्तम पवार यांचा क्लब तर्फे मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप
शेवाळे आणि डॉ. संदीप पाटील यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. निशिकांत नलवडे
यांनी सूत्रसंचालन केले, तर सेक्रेटरी नारायण भोई यांनी
उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी, अध्यक्ष कुशल पटेल,
सेक्रेटरी नारायण भोई, खजिनदार निलेश भादुले,
माजी अध्यक्ष सुभाष आलेकर, संभाजी पाटील,
दिलीप शेवाळे, दिलीप प्रधाने, निशिकांत नलवडे, हरेष पटेल, उदय
पाटील, संजय पाटील, शितल दुग्गे,
पंडित जाधव, चंद्रकांत कागले, क्लबचे सर्व सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

कुल'गुरू'पदाची प्रतिष्ठा लाभूनही ते मनाने ‘गुरु’ राहिले ही बाब केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सार नव्हे, तर एका संपूर्ण शिक्षकीय तत्त्वज्ञानाचे संचित आहे.
ReplyDeleteचार दशके एका संस्थेशी नातं टिकवून, त्या संस्थेला शहाणपणाची ऊब देणं ही गोष्ट सहजसोप्या व्रतासारखी नक्कीच नाही. पण सरांनी ती निस्पृहतेने, शिस्तीने आणि सातत्याने पार पाडली. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना समर्पित राहणं, प्रशासक म्हणून कार्यक्षम निर्णय घेणं, आणि एक व्यक्ती म्हणून नम्रता जपणं, या तिन्ही अंगांमध्ये त्यांनी अद्वितीय समतोल साधला.
शेवटच्या दिवशी कोणताही सोहळा न करता, केवळ एक साधं पण अभ्यासपूर्ण लेक्चर घेणं, हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्युच्च बिंदू ठरावा. ती होती सन्मानाची प्रतिष्ठा, सेवेची बांधिलकी आणि शिक्षकतेची पूर्णता.
शब्द थांबले असतील, पण त्या फळ्यावर उमटलेली प्रत्येक रेघ त्यांच्या स्मृतीरेषा होऊन विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर कोरली गेली आहे. ते केवळ निवृत्त झाले, पण ‘गुरु’ म्हणून ते अजूनही अनेकांच्या मनात बोलत राहतील, शिकवत राहतील...
मा. कुलगुरू डॉ. शिर्के सरांना कृतज्ञतेने, नम्रतेने आणि अंतःकरणपूर्वक नमस्कार व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
— डॉ. के. बी. पाटील