![]() |
| ओंकार पाटील |
![]() |
| सृष्टी मोरे |
![]() |
| प्रीतेश कंठी |
![]() |
| तेजल पाटोळे |
कोल्हापूर, दि.
१८ जून: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एम.बी.ए.
(डिस्टन्स मोड) मध्ये शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांची विविध महत्त्वाच्या
कंपन्यांत निवड झाली आहे.
शिवाजी
विद्यापीठाच्या रोजगार कक्षातर्फे कॅम्पस भरती शिबीर आयोजित करण्यात आले.
त्यामध्ये विविध कंपन्या सहभागी झाल्या. विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण
केंद्रामध्ये एमबीए (डिस्टन्स मोड) शिकणाऱ्या प्रीतेश महावीर कंठी आणि तेजल महेश पाटोळे
या दोन विद्यार्थ्यांची मुथूट फायनान्स या नामांकित कंपनीमध्ये अनुक्रमे ज्युनिअर रिलेशनशिप
एक्झिक्युटिव्ह आणि कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून निवड झाली. तसेच, ओंकार पाटील
यांची अदानी समूहात सेल्स ट्रेनी म्हणून आणि सृष्टी मोरे यांची पुण्याच्या अक्वा चिल
सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एच. आर./ मार्केटिंग इंटर्न म्हणून निवड
झाली आहे.
निवड झालेल्या
विद्यार्थ्यांचे दूरशिक्षण केंद्र संचालक डॉ. के. बी. पाटील यांनी अभिनंदन केले.
ते म्हणाले, या विद्यार्थ्यांची निवड ही दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) अभ्यासक्रमाच्या यशस्वितेचा
आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उघडलेल्या संधीचा एक उल्लेखनीय टप्पा आहे.
विद्यापीठाच्या
या एम.बी.ए. (दूरशिक्षण) अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रज्ञान
शिक्षण परिषद यांची मान्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्केटिंग, मानवी संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशन आणि प्रोडक्शन व्यवस्थापन तसेच
वित्तीय व्यवस्थापन या विषयांत एम.बी.ए.चे शिक्षण घेणे शक्य झाले आहे.




No comments:
Post a Comment