| शिवाजी विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. आसावरी जाधव, डॉ. पद्मा दंडगे, डॉ. प्रकाश राऊत आदी. |
कोल्हापूर, दि. ५ जून: शिवाजी विद्यापीठात आज विविध अधिविभागांच्या परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के,
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते पर्यावरण
शास्त्र अधिविभागाच्या परिसरात विविध स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात
आली. यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव, यांच्यासह माजी विभागप्रमुख डॉ. प्रकाश
राऊत, जैवरसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. पद्मा दंडगे, उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव
यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
त्याचप्रमाणे आज शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या परिसरात आयुर्वेदिक व देशी प्रजातीची रोपे लावण्यात आली. माजी संशोधक विद्यार्थिनी डॉ. अफसाना मणेरी यांनी विभागास रोपे भेट दिली. आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. रुपाली संकपाळ, सरस्वती कांबळे, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, संजय चव्हाण, अतुल जाधव यांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदविला.
![]() |
| शिक्षणशास्त्र अधिविभाग परिसरात वृक्षारोपण करताना डॉ. रुपाली संकपाळ यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी. |

No comments:
Post a Comment