शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग-संगम’ कार्यक्रम
![]() |
| योगसाधना करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के |
![]() |
| प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील |
![]() |
| खासदार धनंजय महाडिक |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग-संगम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योग साधक |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग-संगम कार्यक्रमात सहभागी झालेल्या एनसीसीच्या विद्यार्थिनी |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग-संगम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योग साधक |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग-संगम कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेले योग साधक |
![]() |
| योग साधक |
कोल्हापूर, दि. २१
जून: सकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक असून
त्या दृष्टीने भारताच्या पुढाकाराने ११ वर्षांपूर्वी सुरू झालेला आंतरराष्ट्रीय
योग दिन आज जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.
ही अभिमानाची बाब आहे, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठात आज ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग-संगम’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी
उपस्थितांना संबोधित करताना खासदार महाडिक होते. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे ११ व्या
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 'योग संगम' हा उपक्रम देशभरात साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमात शिवाजी विद्यापीठ
सहभागी झाले. यासाठी
सुमारे ६५० योगसाधकांनी नोंदणी केली आणि आजच्या उपक्रमात सहभागही दर्शविला. विद्यापीठाचे
राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, विद्यार्थी विकास विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र, वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठात संयुक्त राष्ट्र संघाच्या
घोषणेनुसार २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. पहिल्या
आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून अर्थात दि. २१ जून २०१५ पासून गेली ११ वर्षे सलग
दैनंदिन स्वरुपात विद्यापीठात मोफत योग शिबीर घेतले जाते. या उपक्रमाचा दैनंदिन
जवळपास २०० साधक लाभ घेतात. हा उपक्रम येथून पुढेही नित्य स्वरुपात सुरू राहील.
त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपले आरोग्य जपावे, असे आवाहन
त्यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब
बहुउद्देशीय सभागृहामध्ये आज सकाळी ६.१५ ते ८.१५ या कालावधीत योगसाधना शिबीर पार
पडले. खासदार महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यक्रमाचे
उद्घाटन करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी
पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यविज्ञान
विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय
सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र
पवार यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक यांच्यासह नागरिक, एम.ए. (योगशास्त्र), बी.ए. (स्पोर्ट्स) विभागांसह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी या
योगसाधना शिबिरात सहभागी झाले. योगशिक्षक दत्ता पाटील, सूरज पाटील, वीणा मालडीकर
आणि आसावरी कागवाडे यांनी उपस्थितांना योगसाधनेचे प्रशिक्षण दिले. या उपक्रमाचे
विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी विद्यापीठामध्ये योग
शिबिराला नियमित उपस्थित राहणाऱ्या साधकांना प्रातिनिधिक स्वरुपात श्री. महाडिक
यांच्या हस्ते योग मॅट देण्यात आले. नाश्ता व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
संदेशाने प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग
दिनानिमित्त विशाखापट्टणम् येथून संपूर्ण देशाला संबोधित केले. साऱ्या जगाला एका
धाग्यात गुंफण्याची क्षमता योगामध्ये आहे. आरोग्यसुरक्षेसाठी दैनंदिन योगा करणे
आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या भुकेपेक्षा दहा टक्के अन्न कमी सेवन केले,
तरी आरोग्य उत्तम राहील. त्याचप्रमाणे अन्नधान्य आणि संसाधने यांची मोठी बचत सुद्धा
होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या या संबोधनाचे थेट
प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले. त्यांचे संबोधन संपल्यानंतर योग
प्रात्यक्षिकांना सुरवात झाली.












No comments:
Post a Comment