Friday, 6 June 2025

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्यासह मान्यवर.

(अभिवादन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. ६ जून: शिवाजी विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, उपकुलसचिव गजानन पळसे, डॉ. वैभव ढेरे, संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर, विद्यार्थी विकास विभागाच्या सुरेखा आडके, विजय इंगवले, शाहू सेना जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, करण कवठेकर, शशिकांत सोनुले, अथर्व कुराडे यांच्यासह प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

दरम्यान, रायगड येथे आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रमुख कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांचे पथक रायगडावर दाखल झाले आहे. कार्यक्रमात सहभागाबरोबरच कार्यक्रमानंतर गडावर स्वच्छता मोहीम राबवून हे पथक माघारी परतणार आहे.


No comments:

Post a Comment