रत्नागिरी येथे मराठी समाजशास्त्र परिषदेतर्फे डॉ. जगन कराडे यांना पुरस्कार प्रदान करताना डॉ. पी.जी. जोगदंड. सोबत प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. नारायण कांबळे. |
कोल्हापूर, दि. १३
एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या
समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जगन कराडे यांना मराठी समाजशास्त्र परिषदेचे
दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काल (दि. १२) रत्नागिरी येथे पुरस्कार प्रदान
सोहळा पार पडला.
मराठी समाजशास्त्र
परिषदेने या वर्षापासून महाराष्ट्रातील समाजशास्त्र या विषयात शैक्षणिक भर घालणाऱ्या
प्राध्यापकास डॉ. प्रदीप आगलावे उत्कृष्ट संशोधक/ प्राध्यापक पुरस्कार तसेच आय.सी. एस. एस. आर. व विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत संशोधक
ग्रंथास डॉ. सूर्यकांत घुगरे संशोधक ग्रंथ पुरस्कार देण्यात येत आहे. पहिल्या
पुरस्कारासाठी स्वतः डॉ. कराडे तर दुसऱ्या पुरस्कारासाठी त्यांचे ‘ऑक्युपेशनल
मोबीलिटी अमंग शेड्युल्ड कास्ट’ पुस्तक पात्र ठरले.
परिषदेचे ३१वे
राष्ट्रीय अधिवेशन दि. ११ व १२ एप्रिल २०२२ रोजी रत्नागिरीच्या आर.टी. गोगटे कला व
विज्ञान आणि आर.व्ही. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालयात पार पडले. त्यावेळी डॉ. कराडे
यांना ज्येष्ठ समाजसास्त्रज्ञ डॉ. पी.जी. जोगदंड यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान
करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. पी.पी. कुलकर्णी आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ.
नारायण कांबळे हेही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment