कोल्हापूर, दि. १४
एप्रिल: भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात
साजरी करण्यात आली.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि विद्यापीठाच्या
डॉ. आंबेडकर जयंती समारंभाचे प्रमुख पाहुणे राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ.
सुरेंद्र जोंधळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात
येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व
मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. जी.आर. पळसे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन
व विकास केंद्राचे संचालक व अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विज्ञान व तंत्र५न
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील,
राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. आर.जी.
सोनकवडे, डॉ. के.डी. सोनवणे, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. अविनाश भाले यांच्यासह
शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment