Tuesday, 20 February 2024

प्रेरणा व ज्ञान सुदृढीकरण कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

 





प्राणीशास्त्र अधिविभागात आयोजित कार्यशाळेत सहभागी झालेले पदवीस्तरीय विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक


कोल्हापूर, दि. २० फेब्रुवारी: प्राणीशास्त्र विषयामध्ये बी.एस्सी.-३ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात इन्स्पिरेशन अँड नॉलेज स्ट्रेन्दनिंग या विषयावर 'प्रेरणा व ज्ञान सुदृढीकरण कार्यशाळा' आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील विज्ञान महाविद्यालयांतील शिक्षक व विद्यार्थ्यांचा मोठा उत्साही प्रतिसाद लाभला.

या कार्यशाळेचे उद्घाटन प्राणीशास्त्र अधिविभागप्रमुख व संयोजक डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. नितीन कांबळे होते, तर डॉ. अण्णा गोफणे यांनी सचिव म्हणून काम पहिले.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्राणीशास्त्र विषयातील संधी, विभागात असलेल्या सुविधा तसेच विद्यापीठातील विविध सुविधा व योजना याबद्दलची माहिती देण्यात आली. 'प्राणीशास्त्र विषयातील नोकरीच्या संधी या विषयावर विभागप्रमुख डॉ. आशिष देशमुख, 'विभागातील सुविधा' या विषयावर डॉ. अण्णा गोफणे आणि 'विद्यापीठ परिसरातील विविध विद्यार्थी केंद्रित सुविधा व योजना' याविषयी डॉ. नितीन कांबळे यांनी मार्गदर्शन केले. विभागात सुरू असलेल्या संशोधनाविषयीचे विशेष प्रदर्शन विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. या प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने रेशीम उद्योग, कीटकांचे जीवनचक्र व त्यांची विविधता, प्राणीसंग्रहालय, शरीरशास्त्रातील विविध उपकरणे, फुलपाखरू उद्यान, प्राणी संगोपन कक्ष, जेल इलेक्ट्रोफोरेसिस, विविध सूक्ष्मदर्शक, स्पेक्ट्रोमीटर, लॅमिनार एअर फ्लो इत्यादी बाबी प्रदर्शित करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा परिसर, जलसंवर्धनाचे प्रयोग, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र, एकात्मिक सुविधा केंद्र या ठिकाणीही भेटी घडविण्यात आल्या. याविषयी विद्यार्थी व शिक्षकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. डॉ. गोफणे यांनी सर्व सहभागींचे आभार मानले.

No comments:

Post a Comment