कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या वतीने इनोव्हेशन, उद्योजकता आणि स्टार्टअप्स यांचे भित्तीचित्र प्रदर्शन आणि मॉडेल सादरीकरण यांची स्पर्धा झाली. स्पर्धेत ७४ जणांनी सहभाग
नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये ७४ पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसह संशोधक आणि नवउद्योजक सहभागी झाले. त्यांनी आपले संशोधन, उद्योग संकल्पना आणि उत्पादने यांचे सादरीकरण केले. स्पर्धेत शाश्वत विकासाबाबत पर्यावरणीय संकल्पना, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, फौंड्रीतील टाकाऊ वाळूपासून विटांची निर्मिती व रस्त्याकरिता पुनर्वापर, पौष्टिक खाद्यपदार्थ निर्मिती पद्धती, नॅनो-पदार्थापासून औषधे, रंग निर्मिती, जैविक खते, ऊर्जा निर्मिती, हायड्रोजन आणि ऑक्सिजन निर्मितीची उपकरणे इत्यादी संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी मुंबईच्या भाभा अणु संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अपूर्व गुलेरिया व डॉ. प्रभात सिंग, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. आसावरी जाधव, डॉ. संतोष सुतार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यापीठाच्या इनोव्हेशन
व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन
करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. एस.एन. सपली, डॉ. के. एम. गरडकर, डॉ. अनिल घुले, डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. ईरान्ना उडचान, डॉ. हेमराज यादव, डॉ. अभिजीत गाताडे, चेतन भोसले, डॉ. क्रांतीवीर मोरे, डॉ. साजिद मुल्लाणी
आदी उपस्थित होते. या प्रदर्शनाला विद्यापीठातील विविध अधिविभागांसह शहरातील शाळांतील
विद्यार्थी, शिक्षकांनी भेट दिली.
No comments:
Post a Comment