![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना चंद्रशेखर टिळक. मंचावर (डावीकडून) डॉ. दीपा इंगवले, डॉ. आण्णासाहेब गुरव आणि डॉ. केदार मारुलकर. |
कोल्हापूर,
दि. १० फेब्रुवारी: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला स्वतंत्र
उद्योगाचा दर्जा देऊन अधोरेखित
करणारा म्हणून यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन
ज्येष्ठ अर्थविश्लेषक चंद्रशेखर टिळक यांनी
आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागामध्ये
आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अधिविभागप्रमुख डॉ. आण्णासाहेब गुरव अध्यक्षस्थानी
होते.
श्री. टिळक म्हणाले, शिक्षण, आरोग्य
आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही क्षेत्रे या अर्थसंकल्पात अधोरेखित झाली आहेत. शेती,
शिक्षण आणि संरक्षण यांच्या बाबतीत थेट कोणतेही भाष्य नसले, तरी अर्थसंकल्पातील
विविध तरतुदी या क्षेत्रांसाठी लाभदायक आहेत. नव्या क्षेत्रात तयार होणाऱ्या नोकरी
आणि उद्योगाच्या संधी या आव्हानात्मक असतील, याचा तरुणांनी संधी म्हणून उपयोग करून
घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी अर्थसंकल्पातून
तरुणांनी सकारात्मक बदल अंगीकारावेत आणि ज्या क्षेत्रांमध्ये भविष्य आहे, त्या
क्षेत्रांची वाट चोखाळावी, असे सांगितले.
डॉ. केदार मारुलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.
अर्चना मानकर यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. विजय ककडे, डॉ. दीपा इंगवले, डॉ. शशिकांत
कोरे, डॉ. तेजपाल मोहरेकर तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील विद्यार्थी व
महाविद्यालयीन प्राध्यापक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment