![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित पाचदिवसीय विशेष कार्यशाळेचे उद्घाटन करताना न्या. शरद मडके. सोबत अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विधी अधिविभाग प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे आदी |
![]() |
शिवाजी विद्यापीठात आयोजित पाचदिवसीय विशेष कार्यशाळेत न्या. शरद मडके यांचे स्वागत करताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख. शेजारी विधी अधिविभाग प्रमुख डॉ. विवेक धुपदाळे |
कोल्हापूर, दि. ६ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या
विधी अधिविभागामध्ये प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) या योजनेअंतर्गत
“व्हॅल्यू अॅडेड कोर्स ऑन ज्युडिशिअल एक्झामिनेशन ट्रेनिंग” या विषयावरील पाच
दिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञ न्यायाधीश आणि वकीलांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लाभले.
कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी (दि. १) न्यायाधीश
शरद दिगंबर मडके यांच्या हस्ते आणि मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव
देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी न्या. मडके यांनी उत्तम न्यायाधीश कसे बनावे,
न्यायदान करीत असताना घ्यावयाच्या दक्षता याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. देशमुख यांनी
शिवाजी विद्यापीठाने राबवलेल्या विविध योजनांचे विद्यार्थ्यांना होणारे लाभ विषद
केले.
दुसऱ्या सत्रात सरकारी वकील सूर्यकांत मिरजे
यांनी भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ या कायद्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तिसऱ्या सत्रामध्ये न्या. एस. पी. कुलकर्णी यांनी न्यायाधीश म्हणून जबाबदारी बजावत
असताना आलेले अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. न्यायाधीश पदासाठी स्पर्धा परीक्षा
देण्यासाठी करावयाच्या तयारीविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात कोल्हापूर
न्यायालयातील वरिष्ठ फौजदारी वकील गिरीश नाईक यांनी आपले फौजदारी दावे हाताळण्याविषयी
मार्गदर्शन केले. अनेक उदाहरणे देत त्यांनी न्यायाधीश आणि वकील यांच्यामधील व्यावसायिक
नाते कसे जपले पाहिजे, याविषयी सांगितले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून आपल्या शंकांचे समाधान करवून घेतले. कार्यशाळेच्या अखेरच्या सत्रात गिरीश नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. अधिविभागप्रमुख डॉ. विवेक धुपदाळे यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment